Description
प्रकाशकीय
क्षणश: कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत्।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्।।
– क्षण क्षण वाचवून विद्या अर्जन करावी आणि कण कण वाचवून धन जोडावे. क्षण म्हणजे वेळ आणि कण म्हणजे सामग्री इत्यादी वाया घालवली तर विद्येचा आणि धनदौलतीचा कसा बरे लाभ होईल? – अशा अर्थाचे हे संस्कृत सुभाषित आहे.
प्रपंच आणि परमार्थ यथायोग्य होण्याकरता उत्तम व्यवहारज्ञान आणि अध्यात्मविद्या यांची आवश्यकता असते. यासाठीच ‘जीवन विकास’ या रामकृष्ण संघाच्या मासिकातून ‘काही कण – काही क्षण’ ही मालिका १९८१ ते १९९५ अशी सुमारे दीड दशक प्रकाशित करण्यात आली. या लेखमालिकेचे लेखक श्रीमत् स्वामी योगात्मानंद महाराज हे ‘जीवन विकास’चे माजी संपादक असून २००१ पासून अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स येथील वेदान्त सोसायटीचे प्रमुख आहेत.
विविध रंजक-उद्बोधक कथा, प्रसंग, किस्से आणि विनोद यांची पेरणी करीत
पू. महाराजांनी त्यावर सखोल चिंतन मांडले आहे. रोजच्या जगण्यातील संघर्ष, अडचणी यांवरचे उपाय तसेच माणसाची अनंताकडची, चिरंतनाकडची ओढ यांबाबतचे दिग्दर्शन आपल्याला या विविध लेखांमधून वाचायला मिळेल. लेखकाच्या ‘दोन शब्दां’तून वाचकांना पू. योगात्मानंद महाराजांची विद्या-विनय आणि विनोदशीलता यांचा प्रत्यय येईलच.
Contributors : Swami Yogatmananda










